नेस्को कोविड केंद्रात लहान मुलांसाठीही रुग्णखाटा

तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेऊन, लहान मुलांसाठी स्वतंत्र चारशे रुग्ण खाटा कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

गोरेगाव नेस्को कोविड केंद्रातील दुसऱ्या टप्प्यात दीड हजार रुग्ण खाटांची व्यवस्था करण्याचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आले. मात्र, या दीड हजार रुग्ण खाटांबरोबरच तिसऱ्या लाटेमध्ये होणाऱ्या संभाव्य लहान मुलांच्या रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता, याठिकाणी ४०० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

३ हजार ७०० रुग्णखाटा

नेस्को कोविड केंद्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण २ हजार २०० रुग्णखाटा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २०० एचडीयू रुग्णखाटा, तर ३०० ऑक्सिजनची सुविधा असलेल्या रुग्णखाटा होत्या. तर दुस-या टप्प्यातील १ हजार ५०० रुग्णखाटांसह या केंद्राची एकूण क्षमता ३ हजार ७०० रुग्णखाटा इतकी होणार आहे.

(हेही वाचाः नेस्को कोविड केंद्रातील १ हजार ५०० नवीन रुग्णशय्यांचे लोकार्पण)

महापौरांनी केली पाहणी

नेस्को कोविड केंद्रातील दुसऱ्या टप्प्यात ‘ई’ सभागृहात एकूण १ हजार ५०० रुग्णखाटा कोविडबाधित रुग्णांवरील उपचारासाठी नव्याने कार्यान्वित करण्यात येत आहेत. यामध्ये १ हजार रुग्णखाटा प्राणवायू पुरवठा सुविधेसह, तर उर्वरित ५०० सर्वसाधारण रुग्णखाटा आहेत. प्रत्येक रुग्ण खाटांजवळ पंखा, लॉकर व खुर्ची पुरवण्यात आली आहे. या दीड हजार पैकी २०० रुग्ण खाटा ३ मे रोजी कार्यान्वित करुन याचे लोकार्पण राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते पार पडले होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेऊन, लहान मुलांसाठी स्वतंत्र चारशे रुग्ण खाटा कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्याचे कामही सुरू असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here