सर्दी,खोकल्यासाठी औषधं घेताय? मग सावध रहा, देशात इतक्या अँटिबायोटिक्सना परवानगीच नाही

98

सर्दी,खोकला किंवा काही साध्या आजारांवर उपचार म्हणून अनेकजण सर्रोसपणे अँटिबायोटिक्स घेतात. अँटिबायोटिक्सचे सर्वाधिक सेवन केले जात असून, त्याबाबत आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लॅन्सेट या जगप्रसिद्ध नियतकालिकाने या विषयावर एक शोधनिबंध प्रसिद्ध केला असून अँटिबायोटिक्समुळे होणा-या दुष्परिणामांकडे लक्ष वेधले आहे.

अंटिबायोटिक्सचे विपरित परिणाम

अँटिबायोटिक्सच्या अतिसेवनामुळे मानवी शरीराला त्याची सवय होऊन भविष्यात या औषधांचा प्रभाव कमी होऊन ती उपचारासाठी निष्क्रिय होऊ शकतात, अशी भीती आरोग्यविषयक तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, या अँटिबायोटिक्सचा मानवी शरीरावर विपरित परिणाम देखील होऊ शकतो. भारतात अँटिबायोटिक्सच्या वापरावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे ही एक गंभीर बाब असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

(हेही वाचाः मलेरियावरचं औषध बनवणारी कंपनी ते पिण्याच्या पाण्याचा Brand, Bisleriचा इतिहासच Grand)

44 टक्के अँटिबायोटिक्सना परवानगीच नाही

मुख्य म्हणजे देशात सध्या वापरात असलेल्या 44 टक्के अँटिबायोटिक्सना सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनची(CDSCO) परवानगीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे देशात केवळ 46 टक्केच अँटिबायोटिक्स असे आहेत ज्यांना CDSCO कडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे किरकोळ आजारांसाठी वारंवार अँटिबायोटिक्स घेणं हे शरीराला हानिकारक असून, त्यांचे सेवन कमी करण्यासाठी तज्ज्ञांकडून आवाहन करण्यात येत आहे.

(हेही वाचाः ‘या’ औषधाने तीन वर्षांपर्यंत रोखू शकता डायबेटिस, अन्न व औषध प्रशासनाची मंजुरी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.