Mahakumbh 2025 : दिव्याखाली अंधार म्हण सार्थ ठरवणारे पुरोगामी

108
Mahakumbh 2025 : दिव्याखाली अंधार म्हण सार्थ ठरवणारे पुरोगामी
Mahakumbh 2025 : दिव्याखाली अंधार म्हण सार्थ ठरवणारे पुरोगामी
  • हिंदुस्थान पोस्ट ब्युरो

प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. महाकुंभमेळा हे हिंदूंचे विश्वातील सर्वांत मोठे संघटन आहे. यंदाचा महाकुंभमेळा (Mahakumbh 2025) १४४ वर्षांनी आला आहे. त्यामुळे ४५ कोटी भाविक प्रयागराज (Prayagraj) येथील त्रिवेणीसंगमावर अमृतस्नान करणार आहेत.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी यंदा येणाऱ्या भाविकांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत. वास्तविक कुंभमेळा ही पर्यटनाची संधी नसून त्याला धार्मिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. भारतीय संस्कृतीत गंगेला खूप महत्त्व आहे. गंगास्नान, गंगापूजन यासाठी लक्षावधी भाविक वर्षभर या स्थानाला भेट देत आहेत. महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने आताही ४५ कोटी भाविक प्रयागराजला भेट देणार असल्याचा अंदाज आहे. कुंभनगरी अयोध्या भाविकांनी फुलली आहे. असे असताना, असे सर्व श्रद्धामय वातावरण असताना काही समाजवादी, पुरोगामी कुंभमेळ्याच्या पावित्र्यावर चिखलफेक करत आहेत.

(हेही वाचा – पुण्यात NDAजवळ सापडले पाकिस्तानी चलन; सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित)

हुसेन दलवाई यांची गरळओक; महाकुंभामुळे आजार वाढतात

काँग्रेस नेते हुसेन दलवाई (Husain Dalwai) यांनी कुंभमेळ्यावर टीका केली आहे. हुसेन दलवाई यांनी कुंभची हज यात्रेशी चर्चा करताना म्हटले आहे की, “१२ वर्षांतून एकदा आयोजित होणाऱ्या या महाकुंभामुळे आजार वाढतात. महाकुंभमेळ्यादरम्यान बरेच लोक गंगा नदीत स्नान करतात. मला वाटते तिथे खूप घाण असेल. तिथे लोक ज्या पद्धतीने राहत आहेत, त्यामुळे आजार पसरतील. मी दोनदा हजला गेलो होतो. तिथे जी काही व्यवस्था केली जाते, तीच व्यवस्था येथेही केली पाहिजे.” (Mahakumbh 2025)

म्हणे, हजच्या धर्तीवर कुंभमेळा आयोजित करा

“जगभरातून लोक हजकडे येतात. लाखो लोक येतात. अजिबात काही अडचण येत नाही. जर तुम्हाला कुंभमेळा आयोजित करायचा असेल, तर तो तसाच करा. मी उमराहला गेलो होतो, हजला गेलो होतो. त्यानुसार व्यवस्था करा. इथे वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त लोक आहेत, त्यांची तपासणी करा. जर एखादा रोगी निरोगी लोकांसोबत आंघोळ करत असेल, तर त्यालाही रोग होईल. जर लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आंघोळ करतील तर ते कसे चालेल?”

(हेही वाचा – Veg Biryani Recipe : हॅाटेलसारखी व्हेज बिर्याणी बनवा घरच्या घरी, वाचा सोप्या टिप्स …)

जया बच्चन म्हणतात, सर्वाधिक दूषित पाणी महाकुंभमेळ्यात

“महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली. त्या वेळी ज्या भाविकांचा मृत्यू झाला, त्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले. ज्यामुळे ते पाणी प्रदूषित झाले. आजही विचाराल की, सर्वाधिक दूषित पाणी कुठे तर ते महाकुंभमेळ्यात आहे. कारण त्या ठिकाणी कुठलीही स्वच्छता केली जात नाही. मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याने पाणी दूषित झाले आहे. हे पाणी लोकांपर्यंत तसेच पोहचते. लोकांचे लक्ष या घटनेकडून विचलित व्हावे; म्हणून काळजी घेण्यात आली. मृतदेहांचे शवविच्छेदन होऊ दिले नाही. ज्या भाविकांचा मृत्यू झाला, ते मृतदेह थेट पाण्यात फेकण्यात आले. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सामान्य लोकांसाठी कोणतीही विशेष व्यवस्था केली नाही. “ (Mahakumbh 2025)

अशाप्रकारे या स्वयंघोषित पुरोगाम्यांनी महाकुंभमेळ्यावर टीका केली आहे. दिव्याखाली अंधार ही म्हण त्यांनी सार्थ करुन दाखवली आहे. एकीकडे विदेशी लोक श्रद्धापूर्वक गंगास्नान करत आहेत. तर दुसरीकडे आपलेच लोक बदनामी करत आहेत. पण अशा दिड दमडीच्या पुरोगाम्यांमुळे हिंदू धर्माची बदनामी होणार नाही. हिंदू धर्म म्हणजे तेजस्वी सूर्य. त्यावर थुंकण्याचा पुरोगामी प्रयत्न करतात आणि स्वतःचंच तोंड बरबटून घेतात! (Mahakumbh 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.