मनसुख हिरेन हत्येसाठी ४५ लाखांची सुपारी! एनआयएचा न्यायालयात दावा

आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएने आणखी ३० दिवसांचा कालावधी मागितला आहे.

143

मनसुख हिरेन याच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना ४५ लाख रुपये देण्यात आले असल्याचा दावा एनआयएने न्यायालयात केला आहे. एवढी मोठी रक्कम कुठून आली याबाबत एनआयएकडून तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएने आणखी ३० दिवसांचा कालावधी मागितला आहे.

४५ लाख रुपये सचिन वाझेला कुठून मिळाले! 

अंटालिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने सचिन वाझे, प्रदीप शर्मा, सुनील माने रियाजुद्दीन काझी या आजी माजी पोलिसांसह मनसुख हिरेन यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडी आहे. या सर्व प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असून एकट्या मनसुख हिरेन याच्या हत्येसाठी ४५ लाख रुपये मारेकऱ्यांना देण्यात आले असल्याचे एनआयएच्या तपासात उघडकीस आले आहे. ही रक्कम सचिन वाझेने कुठून मिळवली याबाबत तपास करायचा असल्याचे एनआयएने मंगळवारी एनआयए विशेष न्यायालयात सांगितले आहे.

आरोपपत्रासाठी ३० दिवसांची मुदतवाढ मागितली!

या दोन्ही गुन्हयात आरोपींना अटक करून जवळजवळ पाच महिने उलटले असून अद्याप एनआयएने न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले नाही, या गुन्ह्याचा तपास अजून बाकी असून आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयए ३० दिवसांची मुदतवाढ न्यायालयाकडे मागितली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.