मुंबईतील ४५ % भाडेकरू २ BHK घरांच्या शोधात; भाडेदरात ५.४ टक्क्यांनी वाढ, मॅजिकब्रिक्स रेंटल इंडेक्स अहवाल जारी

2022 सालातील चौथ्या तिमाहीत (Q4) मुंबईतील भाड्याच्या जागांची मागणी (शोध) मागील तिमाहीच्या तुलनेत 13.9% कमी झाली, तर जागांची उपलब्धता (लिस्टिंग) 3% वाढली, असे मॅजिकब्रिक्स रेण्टल इंडेक्सने ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या काळात केलेल्या अहवालातून पुढे आले आहे. मुंबईतील जवळपास 45% भाडेकरू 2BHK घरांच्या शोधात आहेत. मॅजिकब्रिक्सचे सीईओ सुधीर पै या प्रवाहांबाबत अधिक माहिती देताना म्हणाले, “2022 सालाच्या पहिल्या दोन तिमाहींच्या काळात भाड्याच्या घरांची मागणी वाढली होती. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर भाड्याच्या घरांची मागणी पुन्हा वाढणे अपेक्षितच होते. त्यात गृहकर्जावरील वाढते व्याजदर व आर्थिक अनिश्चिततता यामुळे संभाव्य गृह खरेदी करणाऱ्यांना घर खरेदी करण्याचा निर्णय पुढे ढकलून भाड्याच्या घरांना पसंती देण्यास प्रोत्साहन मिळाले असावे.”

( हेही वाचा : ब्रिटनच्या संसदेत मोदींची बदनामी; पंतप्रधान सुनक यांनी पाक वंशाच्या खासदाराला सुनावले )

मॅजिकब्रिक्सविषयी: भारतातील पहिल्या क्रमांकाची प्रॉपर्टी साइट

मालमत्तेची खरेदी-विक्री करणाऱ्यांना पारदर्शक पद्धतीने एकमेकांशी जोडून देणारा सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म म्हणून मॅजिकब्रिक्सवर महिन्याला 2 कोटींहून अधिक जण भेट देतात आणि साइटवर 15 लाखांहून अधिक सक्रिय मालमत्तांचे लिस्टिंग आहे. मॅजिकब्रिक्सने आता रिअल इस्टेटशी निगडित सर्व गरजा पूर्ण करणारा संपूर्ण सेवा पुरवठादार म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले आहे. गृहकर्ज, भाडे भरणे, मुव्हर्स अँड पॅकर्स, कायदेशीर सहाय्य, मालमत्तेचे मूल्यांकन आणि तज्ज्ञ सल्ला अशा 15हून अधिक सेवा मॅजिकब्रिक्स पुरवते.

15 वर्षांहून अधिक अनुभव तसेच सखोल संशोधनाधारित ज्ञान यांच्या जोरावर मॅजिकब्रिक्स, एमबीटीव्ही या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन रिअल इस्टेट यूट्यूब वाहिनीसारखे भांडार, प्रस्तुत करतो. तसेच स्वत: विकसित केलेली अन्य काही साधनेही पुरवते. जेणेकरून घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना प्रस्थापित दर तसेच आगामी घटना, स्थळांचे परीक्षण (लोकॅलिटी रिव्ह्यूज) यांसदर्भातील सर्व माहिती उपलब्ध होऊ शकेल.

अधिक तपशिलांसाठी, कृपया संपर्क साधा :

  • अक्षिता अग्रवाल |सीनियर कम्युनिकेशन्स मॅनेजर, मॅजिकब्रिक्स | [email protected]
  • सुखदा देशपांडे I सीनियर इमेज एग्झिक्युटिव, देंत्सु क्रिएटिव पीआरI [email protected]

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here