धक्कादायक! राज्यात ४ हजार ५०० मुले कोरोनाबाधित!

अवघ्या २५ दिवसांत राज्यातील ४ हजार ५०० मुले हे कोरोनाने बाधित झालेले आहेत. मुंबईतील वसतिगृहात तब्बल १५ मुलींना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे आणि सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये मुलांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे चिंता वाढलेली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत २५ टक्के रुग्ण संख्या ही मुलांची आहे.

२५ दिवसांत साडेचार हजार मुले बाधित!  

अवघ्या २५ दिवसांत राज्यातील ४ हजार ५०० मुले हे कोरोनाने बाधित झालेले आहेत. मुंबईतील वसतिगृहात तब्बल १५ मुलींना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरपासून येईल आणि त्यामध्ये दिवसाला ५ लाख रुग्ण संख्या असेल, असे आधीच नीती आयोगाने म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारनेही केरळ आणि महाराष्ट्र येथे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे.

भायखळ्यातील अनाथाश्रमातील १५ मुलींना कोरोना! 

भायखळा आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ बोर्डिंग स्कुल आणि बालिका अनाथाश्रमातील १५ मुलींसह ७ महिला कर्मचारी मिळून २२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यात १२ वर्षांखालील ४ मुलींचा समावेश आहे. त्यामुळे आता हे आश्रम सील करण्यात आले आहे.

पालकांमध्ये चिंतेचे वातावरण! 

दरम्यान देशात अजूनही लहान मुलांचे लसीकरण सुरु झाले नाही. त्यामुळेच आता कोरोनाची बाधा ही लस न घेतलेल्या मुलांना होऊ लागली आहे. विशेषतः सध्या डेल्टा प्लस विषाणूची बाधा होत आहे. हा विषाणू अधिक घातक आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याविषयी चिंताजनक परिस्थिती आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहे. गणेशोत्सव काळात कोरोना नियमांचे पालन झाले नाही तर कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here