Mumbai Hill Area : मुंबईतील दरडींची ४६ ठिकाणे अतिधोकादायक, रहिवाशी तात्पुरत्या पर्यायी पक्क्या घरांमध्ये जाणार का?

384
Mumbai Hill Area : मुंबईतील दरडींची ४६ ठिकाणे अतिधोकादायक, रहिवाशी तात्पुरत्या पर्यायी पक्क्या घरांमध्ये जाणार का?

मुंबईतील दरड प्रवण क्षेत्रातील रहिवाशांना केवळ नोटीस देत आपल्या जबाबदारीतून मोकळे होण्याऐवजी अशा दरडींच्या ठिकाणी राहणाऱ्या धोकादायक ठिकाणांवरील स्थानिकांचे तात्पुरते पक्क्या घरांमध्ये पुनर्वसन करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एमएमआरडीए तसेच म्हाडा प्राधिकरणाला दिले आहेत. मुंबईतील अशाप्रकारे एकूण ७४ ठिकाणे धोकादायक असून त्यातील ४६ ठिकाणे ही अतिधोकादायक आहेत. मात्र, यापैकी उपनगरांमधील केवळ ३० ठिकाणची कामेच हाती घेण्यात आल्याने यासह उर्वरीत १४ ठिकाणच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी तात्पुरत्या पक्क्या घरांमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असला तरी याला स्थानिक सहकार्य करतील करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Mumbai Hill Area)

मुंबईतील डोंगराळ भागात वसलेल्या वस्त्यांमध्ये दरड कोसळून होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीकोनातून सन २०१७ मध्ये भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाने मुंबईतील २४९ ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात करण्यात आलेल्या २४९ संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणांपैंकी ७४ ठिकाणे ही धोकादायक असून ४६ ठिकाणे ही अतिधोकादायक असल्याचे आयआयटीने निश्चित केले होते. (Mumbai Hill Area)

(हेही वाचा – BMC : पावसाळापूर्व कामांची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांची घाटकोपर, विक्रोळी, मुलुंडमध्ये धाव)

इतक्या ठिकाणांचा समावेश 

एकूण २४६ दरडींपैकी शहर भागांमध्ये ३६ असून उपनगरांमध्ये २१२ दरडीची ठिकाणे आहे. यापैंकी शहरात १७ ठिकाणे तर उपनगरांत ५७ ठिकाणे ही धोकादायक आहेत. यातील अतिधोकादायक ठिकाणांची संख्या ४६ असून त्यात शहरात ६ आणि ४० उपनगरांमधील ठिकाणांची सामावेश आहे. मात्र, यातील उपनगरांमधील केवळ ३० ठिकाणी सार्वजनिक बाधकाम विभागामार्फत कामे हाती घेण्यात आली आहे. कामे हाती घेण्यात आलेल्या ३० ठिकाणांपैंकी जिल्हाधिकारी यांच्या ताब्यातील २६ ठिकाणांची आणि महापालिकेच्या हद्दीतील एका आणि खासगी क्षेत्रातील ३ ठिकाणांचा समावेश आहे. (Mumbai Hill Area)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरडीच्या ठिकाणांच्या आसपास राहणाऱ्या कुटुंबांचे पावसाळ्याच्या काळात शाळा आणि इतर ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करण्याऐवजी एमएमआरडी व म्हाडा यांच्या ताब्यातील प्रकल्प बाधितांसाठीच्या सदनिकांची डागडुजी करून त्याचा वापर या कुटुबांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी करण्याचे निर्देश महापालिकेसह एमएमआडीए आणि म्हाडाला केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना या तात्पुरत्या पक्क्या पर्यायी घरांमध्ये जाण्याचे आवाहन केले असले तरी हे रहिवाशी आपली घरे सोडून या सदनिकांमध्ये राहायला जातील का प्रश्न उपस्थित होत आहे. ही घरे सोडल्यास आमची घरे तोडली जातील, त्यावरील हक्क जाईल याची भीती रहिवाशांमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांना ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथील रहिवाशी आपल्या घरातून पर्यायी तात्पुरत्या घरांमध्ये स्थलांतरीत होणार नाही, अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. (Mumbai Hill Area)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.