यंदा अकरावी प्रवेशासाठी ४९ हजार जागा वाढल्या!

90

दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होते. दरवर्षी अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी असलेल्या हजारो जागा रिक्त राहतात तरीही यंदा अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात जागांची वाढ झाली आहे. पनवेल, वसई आणि भिवंडी परिसरातील १७७ महाविद्यालयांचा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यावर्षी नव्याने समावेश झाल्याने या जागांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच मुंबई उपसंचालक कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे.

विभागानुसार आकडेवारी

यंदा अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी १००८ महाविद्यालयांनी मुंबईत नोंदणी केली असून प्रवेश प्रक्रियेसाठी ३ लाथ ६९ हजार ९९५ जागा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यामुळेच अकरावीच्या जागांमध्ये तब्बल ४९ हजारांची वाढ होणार आहे. पनवेल, भिवंडी, वसई या नवीन परिसरातील १७७ महिलयांच्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत समावेश करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना ४८ हजार ७० एवढ्या नव्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

( हेही वाचा : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर! 8,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती  )

क्षेत्र कनिष्ठ महाविद्यालय संख्या प्रवेश क्षमता
मुंबई महानगर – दक्षिण 99 ४८ हजार १९०
मुंबई महानगर – उत्तर 149 ५० हजार ३७५
मुंबई महानगर – पश्चिम 203 ९६ हजार ७१०
ठाणे महानगरपालिका 97 २९ हजार ७९०
कल्याण – डोंबिवली मनपा 84 ३१ हजार ९३०
उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर 58 १८ हजार ७६०
मीरा-भाईंदर मनपा 37 ११ हजार ५६०
नवी मुंबई मनपा 61 २१ हजार १४०
पनवेल मनपा 43 १३ हजार ४७०
विरार – नालासोपारा 96 २९ हजार ५६०
पनवेल ग्रामीण 13 १ हजार ८८०
वसई 5 १ हजार १२०
भिवंडी ग्रामीण 29 ४ हजार ८००
भिवंडी शहर 34 १० हजार ७१०
एकूण 1008 ३ लाख ६९ हजार ९९५
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.