दिल्ली – एनसीआरमध्ये मंगळवारी, 24 जानेवारीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.4 नोंदवण्यात आली. त्याचे केंद्र दिल्लीपासून दूर नेपाळमध्ये होते. नववर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत राष्ट्रीय राजधानीत भूकंप होण्याची ही तिसरी घटना आहे.
Earthquake of Magnitude:5.8, Occurred on 24-01-2023, 14:28:31 IST, Lat: 29.41 & Long: 81.68, Depth: 10 Km ,Location: Nepal for more information Download the BhooKamp App https://t.co/gSZOFnURgY@ndmaindia @Indiametdept @Dr_Mishra1966 @Ravi_MoES @OfficeOfDrJS @PMOIndia pic.twitter.com/y1Ak7VbvFB
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) January 24, 2023
नववर्षाच्या सुरुवातीलाही झालेला भूकंप
नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी रात्रीही दिल्लीत भूकंप आला होता. राष्ट्रीय भूकंप मापन विज्ञान केंद्राने सांगितले की, 1 जानेवारी रोजी मध्यरात्री 1.19 वाजताच्या सुमारास 3.8 तीव्रतेचा भूकंप आला. त्याचे केंद्र हरियाणाच्या झज्जरमध्य होते. त्याची खोली जमिनीखाली 5 किमी आत होती. पण सुदैवाने त्यात कोणत्याही प्रकारची हाणी झाली नाही.
(हेही वाचा गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ! अश्लील नृत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश)
नोव्हेंबरमध्ये 3 वेळा आला होता भूकंप
- तत्पूर्वी, 29 नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यावेळी रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.5 एवढी होती. दिल्लीच्या पश्चिम क्षेत्रात जमिनीखाली 5 किलोमटीर खोल भूकंपाचे केंद्र होते.
- 12 नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीआर व उत्तराखंडमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. भूकंपानंतर नागरिकांनी घरे व कार्यालयांबाहेर धाव घेतली होती. तेव्हा दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद, बिजनौरमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले होते.