Thane मधून पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक

74
Thane मधून पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक
Thane मधून पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक

ठाणे (Thane) जिल्ह्यातील कल्याणमध्ये (Kalyan) बेकायदेशीरपणे वास्तव्यास असणाऱ्या पाच बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi infiltrators) पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व बांगलादेशी घुसखोरांची पोलिस कसून चौकशी करत आहेत.

( हेही वाचा : Mumbai Fire: गोरेगावच्या फर्निचर मार्केटला भीषण आग ; 8 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

कल्याणमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे (Atul zende) यांनी दि. २५ जानेवारी रोजी दिली. त्याच कारवाईदरम्यान, रात्री कल्याणजवळील गांधी नगर (Gandhi Nagar) झोपडपट्टीतून पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. यामध्ये चार महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. ते सर्वजण या भागात लपून राहत होते आणि मजूर म्हणून काम करत होते. (Thane)

तपासादरम्यान, आरोपींकडे भारतात प्रवेश करण्यासाठी आणि राहण्यास परवानगी देणारे कोणतेही वैध कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे या पाच जणांविरुद्ध परदेशी कायदा, भारतीय पासपोर्ट कायदा आणि पासपोर्ट कायद्याच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. (Thane)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.