भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणारा देश आहे. त्यामुळे या तरुण लोकसंख्येच्या बळावर भारत विकसनशीलतेकडून विकसित देश अशी वाटचाल करण्यास सक्षम असल्याचे, बोलले जात असतानाच भारतासमोर बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे. एका नव्या अहवालानुसार, देशातील बेरोजगारांची संख्या 5 कोटींपेक्षा अधिक झाली असून, यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
चिंता वाढवणारा आकडा
सेंटर फाॅर माॅनिटरिंग इंडियन इकाॅनाॅमीने जाहीर केलेल्या अहवालानुसार, डिसेंबर 2021 पर्यंत भारतात बेरोजगार झालेल्यांची संख्या 5 करोड 30 लाखांवर गेली आहे. यात महिलांची संख्या 1 कोटी 70 लाख आहे. नोकरी गेल्याने, बसून असणा-यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक असून, त्या सतत नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सीएमआयईने दिलेल्या माहितीनुसार, नोकरी शोधूनही मिळत नसल्याने, घरी बसून असणा-या तरुणांचा आकडा चिंता वाढवणारा आहे.
( हेही वाचा :आनंदाची बातमी! भारतीय संशोधकांनी कोरोनावर शोधला रामबाण उपाय, 98 टक्के प्रभावी )
महिलांना कमी संधी
भारताला समृद्ध अर्थव्यवस्था बनवण्यासाठी देशातील जवळपास 60 टक्के लोकसंख्येला रोजगार देणे आवश्यक आहे. जागतिक दर्जा मिळवण्यासाठी देशात सध्या 18 कोटी 75 लाख नागरिकांना रोजगार देणे आवश्यक आहे. याच्यासह कर्मचा-यांमध्ये महिलांचा हिस्साही वाढवण्याची गरज असल्याचे, सीएमआयईने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community