मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सोमवारी मुंबईत पाच कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाढत्या रुग्णांसह दर दिवसाला मुंबईत किमान दोन रुग्णांचा बळी जात असल्याचे गेल्या आठवड्याभरापासून दिसून येत आहे. आता मृत्यूचा आकडाही मुंबईत वाढत असल्याने पालिका आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
( हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर दीपक केसरकरांचे सडेतोड उत्तर, त्यांनी लिहिलेले पत्र वाचा जसंच्या तसं…)
कोरोनाचे पहिले बळी
मुंबईत सोमवारी 1 हजार 62 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले. ठाणे शहरांत 224, नवी मुंबईत 197, पनवेलमध्ये 106 आणि पुण्यात 216 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. पिंपरी-चिंचवडमध्ये 75 तर नागपूरात केवळ 35 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात 2 हजार 369 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात कोरोना उपचारातून बरे झालेल्या 1 हजार 402 कोरोना रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आात 97.82 टक्क्यांवर नोंदवले गेले. तर मृत्यूदर 1.85 टक्के नोंदवला गेला. राज्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण 9.73 टक्के असून राज्यात आता 25 हजार 570 कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
Join Our WhatsApp Community