शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना 5 लाख कोटींचा फटका

113

जगभरातील शेअर बाजारातील घसरणीचा प्रभाव भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. परिणामी सोमवारी सेन्सेक्स 1450 अंकांनी कोसळला तर निफ्टी 15,800च्या खाली गेला. भारतीय बाजारपेठेत 5 लाख कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती बाजारातील तज्ज्ञांनी दिली.

दररोज विक्रमी निचांकी

भारतीय बाजारपेठेत सोमवारी सेन्सेक्समध्ये 1450 अंकांची घसरण होऊन तो 52.850 पातळीवर स्थिरावला. तर निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही सुमारे 400 अंकांनी घसरून 15,800 च्या पातळीवर आला. निफ्टीवरील बँक आणि वित्तीय निर्देशांक 2.5 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. आयटी निर्देशांकमध्ये सुमारे 3 टक्क्यांनी, वाहन निर्देशांकमध्ये सुमारे 2 टक्के आणि रियल्टी निर्देशांक 2.5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. आजच्या सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये बजाज ट्विन्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडस इंडिया बँक, कोटक बँक, एचडीएफसी या कंपन्यांचा समावेश आहे. विमा कंपनी एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.  सलग 10 व्या दिवशी शेअर खाली आला असून तो 682 रुपयांपर्यंत खाली आला आहे. सूचीबद्ध झाल्यापासून स्टॉकमध्ये घसरण होत आहे आणि दररोज विक्रमी निचांकी नोंदवली जात आहे.

( हेही वाचा: पंतप्रधानांचा देहू दौरा! आधी ‘नाठाळाचे माथी…’ आता ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म…’ )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.