रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून त्यांनी याविषयीची माहिती घेत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. ही मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. तसेच जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
मुख्यमंत्री ट्वीटद्वारे म्हणाले, “रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडूनही त्यांनी या अपघाताची माहिती घेतली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देशही दिले.”
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून याविषयी संपूर्ण माहिती घेतली. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत देण्याचे निर्देश दिले.
या…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2023
(हेही वाचा – “मुंबईत ४०० एमएम पाऊस झाला” : आदित्य ठाकरेंच्या विधानावर आशिष शेलार यांनी केली टीका; म्हणाले …)
दापोली-हर्णे मार्गावरील आसूद जोशीआळीजवळील वळणावर दापोलीतून आंजर्लेकडे प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा, दापोलीकडे येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत रिक्षाचालक अनिल (बॉबी) सारंग यांच्यासह अन्य आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश असून सर्व प्रवासी पाजपंढरीजवळील अडखळ येथील आहेत. अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community