लोणावळा (Lonavala) शहरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील सगळ्यांना जीव गमवावा लागला आहे. भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या प्रवाहातून ५ जण धरणात वाहून गेले. हे ५ जण एकाच कुटुंबातील आहेत. त्यांपैकी २ जणांचा मृतदेह सापडला असून इतर तिघांचा शोध शिवदुर्ग रेसक्यू पथकाकडून सुरु आहे. रविवार, ३० जून रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. लोणावळा परिसरात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्या कुटुंबातील महिला आणि मुले पाण्यात खेळण्याचा आनंद घेत असतांना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ही दुर्घटना घडली.
(हेही वाचा – Ravindra Jadeja Retirement: रोहित, विराटनंतर रविंद्र जडेजानेही जाहीर केली टी-२० मधून निवृत्ती)
1 वाजण्याच्या सुमारास धरण ओव्हर फ्लो
सकाळीपासून पडत असलेल्या पावसाने भुशी धरणाच्या परिसरातील डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित झाले आहेत. सकाळच्या सत्रात धरण परिसरात पर्यटनासाठी आलेले काही पर्यटक रेल्वेचे विश्रांती गृह असलेल्या भागात डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यातून वाहणाऱ्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेत होते. दरम्यान सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सदरचा धबधब्यातील पाणी वाढत होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हर फ्लो झाले. पाण्याच्या या प्रवाहामुळे ५ जण पाण्याच्या वेगाने धरणात वाहून गेले.
ही माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह त्यांची टीम तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम व स्थानिक युवक यांनी घटनास्थळी जात शोध मोहीम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे कुटुंब वानवडी येथील सय्यदनगर भागातील आहेत.
वाहून गेलेल्यांपैकी 36 वर्षीय महिला आणि 13 आणि 8 वर्षांच्या दोन मुलींचे मृतदेह सापडले आहेत. नऊ वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांच्या मुलीचा शोध सुरू आहे. (Lonavala)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community