कोरोनाचा नवा व्हेरिअंट जेएन १(JN 1) धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. या व्हेरिअंटमुळे देशात आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या व्हेरिअंटचा धोका लक्षात घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (१८ डिसेंबर) हेल्थ अॅडव्हायजरीही जारी केली आहे. यात सर्व राज्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. (Corona virus JN 1)
गर्दी नियंत्रित करा
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अॅडव्हायजरीनुसार, तपासणीमध्ये करोनाच्या नवा व्हेरिअंट जेएन १ च्या भारतातील प्रवेशाची पुष्टी झाली आहे. यामुळे सर्व राज्यांना पूर्णपणे अलर्टवर रहावे लागणार आहे. नव्या वर्षा निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात गर्दी कंट्रोल करण्यासाठी योग्य ती पावले उचलावे लागतील.
(हेही वाचा : CM Eknath Shinde : राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची मदत)
आरटी पीसीआरची टेस्टिंग वाढविण्याची गरज
करोना प्रकरणाची आरटी पीसीआरचा वापर करून टेस्टिंग वाढवावी लागेल. सर्व प्रकारच्या तापांचे नियमितपणे मॉनिटरिंग करावे लागले. तसेच, एखाद्या रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याचे सॅम्पलही जिनोम सिक्वेंसिंगसाठी INSACOG LAB मध्ये पाठवण्यात यावे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५ झाली आहे. मृतांमध्ये ४ जण केरळ, तर १ उत्तर प्रदेशातील आहे. तसेच देशातील मृत्यू दर १.१९ टक्के आहे. यापूर्वी रविवारी देशात कोरोनाचे ३३५ नवे रुग्ण डिटेकट झाले आहे.
हेही पहा –