धान्य, डाळींसह शेतमालावर 5 टक्के जीएसटी

248

धान्य, डाळी आणि अन्य शेतमालावर 5 टक्के जीएसटी लावला असून, 18 जुलैपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे याविरोधात व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. चेंबर ऑफ काॅमर्सने शुक्रवारी पुण्यात तातडीची बैठक बोलावली आहे.

ब्रॅंण्डेड नसलेल्या धान्यावरदेखील कर लावण्यात आला आहे. पोत्यात पॅकिंग करुन लेबलसह विकले जाणारे प्रत्येक धान्यावर आता 5 टक्के जीएसटी लागणार आहे. शेतक-याने बाजारात आणलेले धान्य करमुक्त असेल, पण त्याला लेबल लावून विक्री करताना, मात्र 5 टक्के जीएसटी भरावा लागेल. सर्वसामान्यांच्या ताटातील दररोजचे अन्न असलेली ज्वारी, तांदूळ, गहू, कडधान्ये, डाळी कराच्या जाळ्यात आल्या आहेत.

( हेही वाचा: LPG Gas Price Hike: घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ )

कशी वाढेल महागाई

गव्हाचे 50 किलोचे पोते सध्या 1 हजार 500 रुपयांना मिळत असेल, तर आता 75 रुपये अधिक मोजावे लागतील. 140 रुपये किलोची तूरडाळ 147 रुपयांना, तर 100 रुपयांची मसूरची डाळ 105 रुपयांना घ्यावी लागेल. पॅकिंग करुन विकली जाणारी ज्वारी महागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.