विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ५ हजार ९०२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ५ हजार ८६३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत (Violation of Code of Conduct) तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.
(हेही वाचा आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या संरक्षण शुल्कात कपात का केली ?; Bombay High Court चा प्रश्न)
५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. (Violation of Code of Conduct)
Join Our WhatsApp Community