सर्वसामान्यांच्या खिशाला ‘टोल’मुळे बसणार कात्री! ५ ते १० टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव

149

देशात सध्या मोठ्या प्रमाणात महामार्ग बांधले जात आहेत. दिल्ली-मुंबई महामार्गाचा पहिला टप्पा अलिकडेच खुला करण्यात आला आहे. हे महामार्ग सुरू झाल्याने आता देशभरातील टोलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला टोलसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

( हेही वाचा : कोकण मंडळाच्या ४७५२ घरांसाठी सोडत! या तारखेपासून सुरू होणार अर्ज)

टोल टॅक्समध्ये ५ ते १० टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव

देशभरातील महामार्गावरींल टोल टॅक्समध्ये ५ ते १० टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव एनएचआयने ठेवला आहे. एनएचआय म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकणाने टोल दरवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवला आहे. यावर आता लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

नवीन टोल दर १ एप्रिल २०२३ पासून लागू होण्याची शक्यता 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकणाने हलक्या वाहनांसाठी ५ टक्के आणि ट्रक आणि बस यांसारख्या अवजड वाहनांसाठी १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव वाहतूक मंत्रालयाला पाठवला आहे. मंत्रालयाने या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिल्यास नवीन टोल दर १ एप्रिल २०२३ पासून लागू होतील. मात्र याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. अंतिम निर्णय झाल्यावरच रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडून आदेश जारी करण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.