देशाच्या विविध भागात बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांच्या अटकेच्या बातम्या उघडकीस येत असताना, गुजरातमध्ये बांगलादेशी घुसखोरांशी संबंधित एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ५० घुसखोरांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गुजरातची गुन्हे शाखासुद्धा घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी शेकडो लोकांची चौकशी करत आहेत. (Gujarat)
(हेही वाचा : Hingoli येथे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ; नाकाबंदीत १.४० कोटी रुपये जप्त )
गुजरातच्या (Gujarat) गुन्हे शाखाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेकायदेशीपणे राहणाऱ्या २०० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. हे घुसखोर बनावट आधारकार्ड बनवणे, वेश्याव्यवसाय आणि इतर अनेक बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेले होते. प्राथमिक तपासातून आलेल्या माहितीनुसार, बांगलादेशी ६ ते १० वर्षांपासून देशात राहत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड यांसारखी कागदपत्रे ही जप्त केली आहेत.
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community