भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (संस्कृती मंत्रालय) च्या संरक्षणाखाली महत्त्वाची अनेक स्मारके वाढत्या शहरीकरणामुळे गायब झाल्या असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 8 डिसेंबर रोजी परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीच्या संसदीय स्थायी समितीच्या अहवालाचा एक भाग म्हणून सादर केलेल्या निवेदनात ही बाब समोर आली आहे. ‘इश्यूज रिलेटिंग टू अनट्रेसेबल मोन्युमेंट्स अँड प्रोटेक्शन ऑफ मोन्युमेंट्स इन इंडिया’ असे याचे शीर्षक आहे.
कोणत्या राज्यांतील होती स्मारके?
गायब झालेल्या स्मारकांमध्ये उत्तर प्रदेशातील 11, तसेच दिल्ली आणि हरियाणामधील प्रत्येकी दोन स्मारकांचा समावेश आहे. या यादीत आसाम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील स्मारकांचाही समावेश आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) नुसार, यापैकी 14 स्मारके वाढत्या शहरीकरणामुळे नष्ट झाली आहेत, 12 जलाशय किंवा धरणांमुळे बुडाली आहेत आणि उर्वरित 24 स्मारके सापडत नाहीत. यातील अनेक स्मारके शिलालेख आणि टॅब्लेटशी संबंधित आहेत, ज्यांचा निश्चित पत्ता नाही. कदाचित ही स्मारके हलवली असावीत अथवा खराब झाली असतील, त्यामुळे आता त्यांना शोधणे कठीण बनले आहे. गायब झालेली स्मारके 1930, 40 आणि 50 च्या दशकात मध्यवर्ती संरक्षित स्मारकांपैकी बरेच आहेत. 2013 मध्ये नियंत्रक आणि महालेखा परीक्षकानेही 92 स्मारके गायब झाल्याचे घोषित केले होते. संसदीय समितीने नमूद केले की कॅग ने जाहीर केलेल्या गायब 92 स्मारकांपैकी 42 स्मारकांची ओळख पटलेली आहे.
(हेही वाचा ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ करणं पडलं महागात; मुंबई पोलिसांकडून 156 जणांवर कारवाई)