- प्रतिनिधी
राज्यातील ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठी राज्य सरकारने ५० कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे. गृह विभागाने मंगळवारी (१० सप्टेंबर) यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. या निर्णयामुळे पात्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना योजनांचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. (Cabinet Meeting)
(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : पुणे शहरातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद)
१६ मार्च २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने या महामंडळाला शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांचे नाव दिले आहे.हे महामंडळ स्वायत्त आणि स्वयंपूर्ण व्हावे या हेतूने राज्य सरकारने एक वेळेचे अनुदान म्हणून महामंडळाला ५० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी महामंडळात जमा करण्यासाठी परिवहन आयुक्तांना आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. (Cabinet Meeting)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community