नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात व हद्दीबाहेर मुंबई, बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, दहिसर, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, उलवे नोड, खोपोली, कर्जत व वाशिवली / रसायनी या विभागात 40 सर्वसाधारण व 37 वातानुकूलीत अशा एकूण 77 विविध बसमार्गांवर प्रवासी सेवा देण्यात येत आहे.
त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या “महिला सशक्तीकरण” या अभियानाच्या संकल्पनेतून व महिला सन्मानार्थ नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून महिलांसाठी उपक्रमाच्या बसेसधून प्रवास करतांना तिकीट दरात 50% सवलत देण्याच्या प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक नमुंमपा यांनी मंजूरी दिलेली आहे.
(हेही वाचा – BMC : विक्रोळी, कांजुरमार्ग व भांडूप परिसरातील नागरिकांसाठी ९० खाटाचे रूग्णालय)
नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा आणि प्रकल्पांचे लोकार्पण व भुमिपूजन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घोषित केल्यानुसार महिलांना नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करताना तिकीट दरात 50% सवलत 14 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून दैनंदिन दोन लाखाहून अधिक प्रवाशी प्रवास करीत असून त्यामध्ये साधारणतः 40% महिला प्रवासी प्रवास करतात. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्या अंदाजित 80,000 महिला प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. तरी महिलांनी या प्रवास सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community