फक्त २९ रुपयांमध्ये करा एसी लोकलने प्रवास! पहा नवे दरपत्रक…

93

मुंबई एसी लोकलच्या दरांत कपात व्हावी अशी मागणी मुंबईकरांकडून होत होती. दिवसेंदिवस मुंबईत उन्हाच्या चांगल्याच झळा मारायला लागल्या आहेत. या निमित्ताने एसी लोकलच्या भाड्यात ५० टक्के कपातीची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी केली आहे. यामुळे मुंबईकरांना आता गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे. या घोषणेनुसार एसी लोकलमधून पाच किलोमीटरचा प्रवास ६५ ऐवजी आता केवळ ३० रुपयांमध्ये करता येणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही एसी लोकलच्या भाड्यात कपात केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहेत.

( हेही वाचा : आता आकाशातून पहा विलोभनीय कोकण )

प्रवाशांची मागणी मान्य 

रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम मार्गावर एसी लोकल आधीच सुरू केल्या आहेत. मात्र, त्याच्या अतिरिक्त भाड्यामुळे प्रवाशांना एसी लोकलचा प्रवास परवडत नव्हता. यामुळे एसी लोकलला पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता. प्रवाशांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे एसी लोकलचे भाडे कमी करण्याची मागणी केली. आता अखेरीस प्रवाशांची ही मागणी मान्य झाली आहे. याआधी २५ किलोमीटरच्या प्रवासासाठी मुंबईकरांना १३५ रुपये मोजावे लागत होते. मात्र तिकिटाची ही रक्कम यापुढे ६५ रुपये इतकी असणार आहे. तसंच ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करणाऱ्यांकडून याआधी २०५ रुपये तिकीट आकारले जात होते, हे भाडे आता १०० रुपये इतके असणार आहे.

पहा दरपत्रक 

 

सध्या पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार, मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), कल्याण-कर्जत रेल्वे स्थानके आणि सीएसएमटी-पनवेल रेल्वे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावर एसी लोकल धावत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.