संभलमध्ये सापडलेल्या जुन्या मंदिरानंतर आता देशभरात मंदिरे सापडण्यास सुरुवात झाली आहे. आता बिहारची राजधानी पाटनामध्ये शेकडो वर्ष बंद असलेले एक मंदिर स्थानिक नागरिकांनी शोधले आहे. हे भगवान शिवाचे मंदिर (Shiva Temple)
( हेही वाचा : Sanjay Shirsat यांच्या कन्येने कोणतेही अधिकृत पद नसताना सिडकोच्या कामांचा घेतला आढावा)
असल्याची माहिती आहे. त्याठिकाणी एक जुने शिवलिंग सुद्धा आहे. या मंदिरात पूजा-अर्चनाही सुरु आहेत. सध्या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. प्रशासन ही मंदिराच्या आसपासच्या परिसरात भक्तांच्या सोईसाठी व्यवस्था करत आहे. (Bihar)
मातीच्या ढिगाऱ्याखाली आढळले शिवमंदिर
पाटनामध्ये हे मंदिर आलमगंज पोलिस ठाण्याच्या लक्ष्मणपुर परिसरातील आहे. इथे एक मठ सुद्धा आहे. स्थानिक नागरिकांनाही मठाशेजारी मंदिर असल्याची माहिती नव्हती. एका दिवशी चहारदीवारीजवळ जमिनीत हे शिवलिंग आढळले. त्यानंतर याठिकाणी खोदकाम सुरु झाले. जेव्हा माती हटवण्यात आली तेव्हा मंदिराचा काही भाग इथे आढळला. (Bihar)
इथे एक छोटे मंडपनुपा मंदिर आहे. तिथे शिवलिंगही होते. त्यानंतर मंदिराचा भाग साफ करण्यात आला. ते शिवलिंग (Shiva Temple) मातीच्या ढिगाऱ्याखाली असले तरीही सुरक्षित होते. दरम्यान मंदिरात पूजा अर्चना चालू करण्यात आली आहे. शिवलिंग विशेष प्रकार तयार करण्यात आले आहे. शिवलिंगाच्या आजूबाजूला मंडपनुमा मंदिर आहे. जे मंदिर फार सुंदर असून भक्तांचा या मंदिराकडे ओढ असल्याचे पाहायला मिळाला. (Bihar)
शेकडो वर्ष जुने मंदिर
स्थानिक लोकांनी दावा केला की, हे मंदिर अंदाजे ५०० वर्ष जुने आहे. या मंदिराला (Shiva Temple) आजूबाजूला लाहौरी विटा असल्याचे पाहायला मिळाले. या मंदिरात जाण्यासाठी ४ प्रवेशद्वार आहेत. त्यातील २ प्रवेशद्वार बंद आहेत. तसेच मंदिराच्या आतील बाजूला मंडपनुमा मंदिरात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती. (Bihar)
Join Our WhatsApp Community