BMC : मुंबईतील सर्व समुद्र चौपाट्यांसह गेटवे जवळ प्रखर प्रकाश व्यवस्था; स्वच्छतेसाठी ५ हजार कामगार तैनात

377
Property Tax : मुंबई महापालिकेकडून ६८ टक्के मालमत्ता कराची वसुली
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून पहाटेपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मरीन ड्राइव्ह आणि भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया), छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), जुहू चौपाटी, दादर चौपाटी आदी सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत दिनांक ३१ डिसेंबरच्या रात्री जमा होणाऱ्या कचऱ्याचे दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेपूर्वी व्यवस्थापन करण्यात येईल. यासाठी विविध संयंत्रांसह अतिरिक्त पाच हजार मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली आहे. पोलिसांच्या सुचनांनुसार, मरीन ड्राइव्ह ते भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) येथे आवश्यक त्याठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था तसेच दुभाजकांच्या ठिकाणी बॅरिकेडींग करण्यात आली आहे. मरीन ड्राइव्ह येथे ७ आणि भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) येथे ४ निरीक्षण मनोरे (वॉच टॉवर) उभारण्यात आले आहेत. (BMC)

दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) आणि मरीन ड्राइव्ह, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), जुहू चौपाटी, दादर चौपाटी आदी ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येने जमतात. नववर्षाच्या सोहळ्यानंतर परिसर स्वच्छ आणि सुंदर राहावा, यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली जावी, यासाठी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

(हेही वाचा – Goodbye 2024 : गोलंदाजीत भारताच्या जसप्रीत बुमराहचा जगभर डंका)

नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ डिसेंबर २०२४ रात्रीपासून १ जानेवारी २०२५ रोजी पहाटेच्या कालावधीदरम्यान मरीन ड्राइव्ह येथील नेताजी सुभाष मार्गावर रस्त्याच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या नियमित कर्मचारी व कामगारांसोबतच २० अशासकीय संस्थांचे कामगार नेमण्यात आले आहेत. भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) येथे रात्र पाळीमध्ये रस्त्याच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या नियमित कर्मचारी व कामगारांसोबतच १० अशासकीय संस्थांचे कामगार नेमण्यात आले आहेत.

पोलिसांच्या सुचनांनुसार, मरीन ड्राइव्ह ते भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) येथे आवश्यक त्याठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था तसेच दुभाजकांच्या ठिकाणी बॅरिकेडींग करण्यात आली आहे. मरीन ड्राइव्ह येथे ७ आणि भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) येथे ४ निरीक्षण मनोरे (वॉच टॉवर) उभारण्यात आले आहेत. तसेच, या परिसरात रात्रीपाळीमध्ये मिस्ट व्हेईकल आणि लिटर पिकर या वाहनांसोबतच जेसीबी, डंपर्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या कामांचे पर्यवेक्षण करण्यासाठी दोन अतिरिक्त कनिष्ठ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी संकलित होणाऱ्या कचऱ्याचे निष्कासन दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच नववर्षाच्या दिवशी सकाळी ७ वाजेपूर्वी करण्यात येईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.