Online Gaming : ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 55 हजार कोटींची कर नोटीस; जीएसटी भरणा थकवल्याचा आरोप

116
Online Gaming : ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 55 हजार कोटींची कर नोटीस; जीएसटी भरणा थकवल्याचा आरोप
Online Gaming : ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 55 हजार कोटींची कर नोटीस; जीएसटी भरणा थकवल्याचा आरोप

जीएसटी गुप्तचर विभागाने 55 हजार कोटी कर थकबाकीबद्दल 12 कॅसिनो आणि 12 ऑनलाइन रिअल-मनी गेमिंग कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. (Online Gaming) गेमिंगच्या एकूण उत्पन्नावरील जीएसटी भरणा थकवल्याचा या कंपन्यांवर आरोप आहे. यामध्ये ड्रीम इलेव्हन, गेम्स प्ले, ट्वेंटीफोर सेव्हन, हेड डिजिटल वर्क्स या कंपन्यांचाही समावेश आहे. या उद्योगांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मते आगामी काळात गेमिंग कंपन्यांना 1 लाख कोटी रुपयांपर्यंत नोटीस दिली जाऊ शकते. (Online Gaming)

(हेही वाचा – NCP : समीर भुजबळांकडे मुंबईची जबाबदारी देण्यास राष्ट्रवादीतूनच विरोध)

गेमिंग युनिकॉर्न कंपनी ड्रीम इलेव्हनने 25 हजार कोटी रुपयांचा जीएसटी थकवल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. अप्रत्यक्ष कर भरणा थकवल्याप्रकरणी बजावण्यात आलेली देशातील ही सर्वात मोठी कर नोटीस आहे. नोटीस मिळाल्यानंतर ड्रीम इलेव्हन कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये बंगळुरूची ऑनलाइन गेमिंग कंपनी गेम्स क्राफ्ट टेक्नॉलॉजीला 21 हजार कोटींची कर नोटीस बजावण्यात आली होती. याविरोधात कंपनीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने 6 सप्टेंबरला जीएसटीची मागणी रद्द करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशला स्थगिती दिली. या प्रकरणातील पुढील सुनावणी या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. या दरम्यान 16 सप्टेंबरला गेम्सक्राफ्टने त्यांचे सुपरऍप गेमजी बंद केले. (Online Gaming)

अप्रत्यक्ष कर प्रकरणाच्या इतिहासात एवढ्या प्रचंड रकमेची कर नोटीस पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.