Western Railway: पश्चिम रेल्वेवरील सुरत यार्डमधील तांत्रिक कामासाठी ५६ तासांचा ब्लॉक

हजारांहून अधिक प्रवाशांचे हाल होणार आहेत.

155
Western Railway: पश्चिम रेल्वेवरील सुरत यार्डमधील तांत्रिक कामासाठी ५६ तासांचा ब्लॉक
Western Railway: पश्चिम रेल्वेवरील सुरत यार्डमधील तांत्रिक कामासाठी ५६ तासांचा ब्लॉक

आधीच दर रविवारच्या मेगाब्लॉक मुळे मेटाकुटीला आलेल्या प्रवाशांना आता पश्चिम रेल्वे (Western Railway) वरील सुरत यार्डमधील नॉन-इंटरलॉकिंगच्या कामानिमित्त शनिवारी सकाळी ९.३० ते सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार ते सोमवार दरम्यानच्या ५९ रेल्वेगाड्या पूर्णत: रद्द, तर ३० रेल्वेगाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे हजारांहून अधिक प्रवाशांचे हाल होणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे. यासाठी ५६ तासांचा ब्लॉक घेऊन सुरत – उधना तिसऱ्या मार्गिकेचे व इतर कामे करण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेने २५ ऑगस्टपासून मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस ते गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश अप आणि डाऊन रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही रेल्वेगाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र पश्चिम रेल्वेने प्रवाशांना विश्वासात न घेता, ब्लॉकची माहिती फक्त एक दिवस आधी दिली. भविष्यात प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे असे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा : Mumbai Municipal Corporation : रस्ते बांधकामात प्लास्टिकचा महापालिकेला पडला विसर)
१२० दिवसांपासून केलेली आरक्षण रद्द
१२० दिवसांपासून आरक्षण केलेल्या रेल्वेगाड्या थेट रद्द केल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. कमी कालावधीमध्ये रेल्वेगाड्या रद्द झाल्याची माहिती मिळाल्याने प्रवाशांना पर्यायी मार्ग शोधावा लागत आहे. मात्र खूप कमी वेळेत पर्यायी मार्ग उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्याचे नियोजन रद्द करावे लागले आहे.पश्चिम रेल्वेने अचानक तीन दिवसीय ब्लॉक घेतला. एवढा मोठा ब्लॉकची माहिती आदल्यादिवशी देण्यात आली. ही बाब निंदनीय आहे. मात्र प्रवाशांना विश्वासात न घेता, गाडी रद्द झाल्याचा संदेश मोबाइलवर पाठवला जातो. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल होणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.