Dagdusheth Halwai Ganapati : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ५६ लाख भक्तांनी घेतले ऑनलाईन दर्शन

भारतासह परदेशातूनही ट्रस्टच्या फेसबुक, यू ट्यूब, संकेतस्थळाला दिली भेट

265
Dagdusheth Halwai Ganapati : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ५६ लाख भक्तांनी घेतले ऑनलाईन दर्शन
Dagdusheth Halwai Ganapati : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ५६ लाख भक्तांनी घेतले ऑनलाईन दर्शन

नेपाळ, अमेरिका, थायलंड, कॅनडा, इंडोनेशिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आदी देशांमधून वेबसाईट, फेसबुक, यू ट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटरसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सोशल मीडियावर जगभरातील तब्बल ५६ लाखांहून अधिक गणेशभक्तांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले आहे. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील गणेशभक्तांचे आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे (Dagdusheth Halwai Ganapati) दर्शन प्रत्यक्ष घेता आले नसले, तरी ऑनलाईन माध्यमातून उत्सवाचा आनंद जगभरातील भाविक घेत आहेत. ट्रस्टतर्फे विविध ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टतर्फे १३१वा गणेशोत्सव साजरा होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम सुरू झाले. तेव्हापासून ट्रस्टच्या वेबसाईटवरून हजारो भाविक दर्शन घेतात. वेबसाईटवरून दररोज सकाळी व रात्री होणारी लाईव्ह आरती व दर्शन देखील गणेशभक्त घेत आहेत.

(हेही वाचा – Dream 11 Company : ‘ड्रीम इलेव्हन’ कंपनीला आयकर विभागाची नोटीस)

भारतातील पुणे, मुंबई, दिल्ली, नागपूर, नाशिक, ठाणे, गुजरातमधील अहमदाबाद, सूरत, कोल्हापूर, नेपाळमधील काठमांडू आदी शहरांमधून आॅनलाईन पद्धतीने बाप्पांचे दर्शन घेण्यात आले आहे तसेच नेपाळ, अमेरिका, थायलंड, कॅनडा, इंडोनेशिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील भक्तांनी दगडूशेठ च्या श्रीं चे दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या सोशल मीडियावर भेट दिली आहे.

सुमारे ३४ लाख ६९ हजार भाविक फेसबुकवरून, इन्स्टाग्रामवर २१ लाख ७७ हजार यांसह १८ हजारहून अधिक यूटयूब व अ‍ॅप वरुन देखील गणेशभक्तांनी भेट दिली आहे. यामुळे यंदाच्या गणेशोत्सवकाळात आजपर्यंत तब्बल ५६ लाखांहून अधिक गणेशभक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेतला आहे. डिजीटल माध्यमातून ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांनादेखील भक्त जोडले गेले आहेत.

भाविकांना आॅनलाईन सुविधांचा लाभ घेण्याचे ट्रस्टतर्फे आवाहन 
उत्सवकाळात भारतासह परदेशातील गणेशभक्तांना घरच्या घरी श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्थादेखील ट्रस्टने केली असून ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन सुविधांचा देखील लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.