Cyclone Dana मुळे ५६ टीम्स हाय अलर्टवर; भुवनेश्वर-कोलकाता उड्डाणांवर १६ तासांसाठी बंदी, ५५२ ट्रेन रद्द

127
Cyclone Dana मुळे ५६ टीम्स हाय अलर्टवर; भुवनेश्वर-कोलकाता उड्डाणांवर १६ तासांसाठी बंदी, ५५२ ट्रेन रद्द
Cyclone Dana मुळे ५६ टीम्स हाय अलर्टवर; भुवनेश्वर-कोलकाता उड्डाणांवर १६ तासांसाठी बंदी, ५५२ ट्रेन रद्द

दिवाळी अवघ्या आठवड्यावर आली असून अद्यापही राज्यात पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह कोकणात देखील पाऊस हजेरी लावणार आहे. देशाच्या पूर्व किनारपट्टीला ‘दाना’ चक्रीवादळ (Cyclone Dana) धडकणार आहे. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

(हेही वाचा-Pimpri Chinchwad मध्ये कोसळली पाण्याची मोठी टाकी; ५ कामगारांचा मृत्यू)

अशातच, हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दल या दाना चक्रीवादळावर सातत्याने लक्ष देखील ठेवून आहे. यामुळे आता चक्रीवादळामुळे तब्बल 56 पथके तैनात करण्यात आली आहे. मात्र या चक्रीवादळाचा परिणाम हा महाराष्ट्रात देखील दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले चक्रीवादळ ‘दाना’ ताशी 18 किमी वेगाने ओडिशाच्या (Odisha) किनारपट्टीकडे सरकत आहे. ओडिशातील भद्रकमध्ये गुरुवारी सकाळी पावसाला सुरुवात झाली. चक्रीवादळ 24 ऑक्टोबर रोजी पहाटे 2 वाजता भितरकणिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा बंदराजवळ धडकेल. (Cyclone Dana)

(हेही वाचा-Maharashtra Assembly Poll : महाराष्ट्रात वातावरण फिरलंय; काँग्रेस नेत्याची कबुली)

भुवनेश्वर हवामान केंद्राच्या मते, लँडफॉलची प्रक्रिया 5 तास चालेल. यावेळी, वादळ ओडिशाच्या उत्तरेकडील भागातून ताशी 120 किमी वेगाने पुढे जाईल. ओडिशा आणि पश्चिम बंगालवर या वादळाचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. त्यामुळे भुवनेश्वर आणि कोलकाता विमानतळांवर गुरुवारी संध्याकाळी 5 ते 25 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजेपर्यंत सुमारे 16 तास उड्डाणे रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय 552 गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण पूर्व रेल्वेने 150 गाड्या रद्द केल्या आहेत , ईस्ट कोस्ट रेल्वेने 198 गाड्या रद्द केल्या आहेत, ईस्टर्न रेल्वेने 190 गाड्या रद्द केल्या आहेत आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने 14 ट्रेन रद्द केल्या आहेत. (Cyclone Dana)

(हेही वाचा-कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर सील करा; Shiv Sena ने का केली मागणी ?)

ओडिशातील 14 जिल्ह्यांमध्ये 25 ऑक्टोबरपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. या जिल्ह्यांतील 10 लाख लोकांना स्थलांतरित केले जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व पर्यटन उद्याने, ओडिशा उच्च न्यायालय 25 ऑक्टोबरपर्यंत बंद करण्यात आले आहे. ओडिशाने राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF), ओडिशा आपत्ती निवारण दल (ODRF) आणि अग्निशमन दलाच्या 288 तुकड्या तैनात केल्या आहेत. (Cyclone Dana)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.