कोरोनानंतर डिजिटल व्यवहारात ५७ टक्क्यांनी वाढ; PhonePe आणि Google Pay यांचा किती आहे सहभाग?

133

कोरोनानंतर देशभरात डिजिटल पद्धतीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. २०२४ या वर्षात अशा प्रकारच्या व्यवहारात ५७ टक्क्यांनी वाढ झाली, त्यात PhonePe आणि Google Pay यांचा सर्वाधिक वाटा आहे. अहवालानुसार, UPI च्या एकत्रित मार्केटमध्ये PhonePe आणि Google Pay चा ८६ टक्के वाटा आहे.

गेल्या तीन वर्षांत क्रेडिट कार्डचे व्यवहार दुप्पट झाले आहेत. वार्षिक आधारावर डेबिट व्यवहारांमध्ये ४३ टक्के घट झाली आहे. भारतीय बँकिंग व्यवस्थेने पत वाढीची मजबूत गती कायम ठेवली आहे. FY24 मध्ये क्रेडिट वाढ १५ टक्के आणि डेबिट वाढ १३ टक्क्यांनी वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये पहिल्यांदाच बँकिंग क्षेत्राचा एकूण निव्वळ नफा ३ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.

(हेही वाचा उत्तन येथील बेकायदा दर्ग्याच्या ट्रस्टींना Bombay High Court ने दिला अल्टिमेटम )

सर्व बँक ग्रुपनी मालमत्ता परतावामध्ये १ टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. बँकेला ही उच्च पत वाढ, चांगली हेल्थ ग्रोथ, उच्च क्रेडिट ग्रोथ कमी पत वाढ यांचा फायदा झाला आहे. प्रायव्हेट बँकेच्या नफ्यात वर्ष-दर-वर्ष २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या निव्वळ नफ्यात ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकांच्या एकूण अनुत्पादित मालमत्ता २.८ टक्क्यांच्या सार्वधिक नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. अहवालात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची सकल अनुत्पादित मालमत्ता ३.५ टक्क्यांपर्यंत आणि खासगी बँकांची जीएनपीए १.७ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.