परम शांतीधाम वृद्धाश्रमात ५८ जण कोरोनाबाधित!

कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे.  

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच शाळा-महाविद्यालये अथवा वसतिगृह अशा सामूहिक ठिकाणांना प्रतिबंध करण्यात आला असला, तरी ठिकठिकाणचे वृद्धाश्रम सुरूच आहेत. त्यातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाच प्रकारे मुंबईच्या जवळच असणाऱ्या पनवेलमध्ये परम शांतीधाम नावाचा वृद्धाश्रम आहे, या वृद्धाश्रमामध्ये एकूण ६१ निराधार वृद्धांपैकी ५८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

(हेही वाचा : सचिन वाझेचा चालक बनला माफीचा साक्षीदार!)

२ जणांचा मृत्यू 

याठिकाणी ५८ जणांना कोरोनाची लागण झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय १६ जणांना ऑक्सिजनची गरज होती. त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. वृद्धाश्रमात आयसोलेट करण्यात आलेल्या व्यक्तींचे परीक्षण केले जात आहे. रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये कोरोनाची आकडेवारी सर्वाधिक आहे. याठिकाणी दररोज ४०० ते ५०० नव्या रुग्णांची नोंद होत असते. अशावेळी वृद्धाश्रमासारख्या ठिकाणी अशाप्रकारे हलगर्जीपणा होणे अतिशय धोकादायक आहे. १४ वृद्धांवर कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. एकाच वेळी एकाच ठिकाणी कोरोनाबधित अधिक संख्येने आढळून आल्याने आता प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. हे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले असून पनवेल मनपा प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here