सर्पदंशाने वर्षभरात ५८ हजार मृत्यू; उपाय करण्याचे Supreme Court चे केंद्राला निर्देश

198

साप चावल्यामुळे (Death by snakebite) मृत्यू येण्याची समस्या संपूर्ण देशात असून, सर्व राज्यांची मदत घेत सर्पदंशासाठी उपचार उपलब्ध करून देण्यासाठी काहीतरी करा, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला निर्देश दिले. (Supreme Court)

न्यायमूर्ती बी. आर. गवई (Justice B. R. Gavai) आणि न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भट्टी (Justice S. V. N. furnace) यांच्या खंडपीठासमोर याबाबतच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. साप चावल्यानंतर त्यावर उपचारासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या अँटी-व्हेनमची (Anti-venom) कमतरता जाणवत असून, यामुळे देशाला सार्वजनिक आरोग्याच्या (public health) मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे, असे याचिकेत म्हटले होते. यावर न्यायालयाने तुम्ही यावर उपाय काढण्यासाठी सर्व राज्यांच्या प्रतिनिधींना भेटून काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकता. हा काही विरोधी खटला नाही, असे म्हटले.

डॉक्टरांना प्रशिक्षित करा 

प्राण वाचवण्यासाठी आरोग्य केंद्रे, सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अँटी-व्हेनम आणि सर्पदंश उपचार देण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच डॉक्टरांना यासाठी विशेष प्रशिक्षित करावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. अधिवक्ता चांद कुरेशी यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. ग्रामीण भागात सर्पदंश प्रतिबंधक आरोग्य अभियान आणि जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Baba Siddique हत्या प्रकरण: डायरीतून मोठे राजकीय नाव उघड)

देशात ५८ हजार मृत्यू हे साप चावल्यामुळे होतात. तर ५४ लाख मृत्यू जगभरात होत आहेत. तसेच भारतात ४ लाख घटना या चावण्याच्या घडतात. यामध्ये ३ लाख लोक दिव्यांग होतात. तर ५०% पेक्षा अधिक रूणांचा मृत्यू हा मागील जून ते सप्टेंबर ते दरम्यान साप चावण्यामुळे होतात. तर ९७% मृत्यू साप चावण्यामुळे ग्रामीण भागात होतात.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.