5G For Corporates : विप्रो आणि नोकियाची कंपन्यांसाठी ५जी सेवा 

5G For Corporates : सुरुवातीला काही ठरावीक प्रकारच्या कंपन्यांनाच या खाजगी सेवेचा लाभ घेता येणार आहे 

199
5G For Corporates : विप्रो आणि नोकियाची कंपन्यांसाठी ५जी सेवा 
5G For Corporates : विप्रो आणि नोकियाची कंपन्यांसाठी ५जी सेवा 

ऋजुता लुकतुके

विप्रो लिमिटेड (Wipro Limited) आणि नोकिया कॉर्प (Nokia Corp) या कंपन्यांनी एकत्र येऊन व्यावसायिक कंपन्यांना खाजगी ५जी (5G For Corporates) सेवा देणारी एक यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे कंपन्यांमध्ये आधीपासून असलेल्या इंटरनेट जोडणीला वेग प्राप्त होईल. आणि त्यांना रिअलटाईम अतीवेगवान काम करणं सोपं जाईल. सुरुवातीला उत्पादन, ऊर्जा, युटिलिटी, वाहतूक आणि क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातील कंपन्यांनाच ही सेवा पुरवली जाईल. (5G For Corporates)

(हेही वाचा- CM Eknath Shinde : अंगणवाडीतील मुलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डेस्कबॅगचे वाटप )

ही सेवा कंपन्यांमध्ये असलेल्या इंटरनेट सेवेलाच जोडली जाईल. पण, त्यामुळे कामाचा वेग वाढण्याबरोबरच नेटवर्कची कार्यक्षमता वाढेल. आणि कमी वेळ व खर्चात जास्त डेटा कंपनीला (5G For Corporates) वापरता येईल. इथं डेटा म्हणजे ऑनलाईन माहिती अभिप्रेत आहे. हे नेटवर्क डेटा सुरक्षेचीही काळजी घेईल, असा दावा विप्रो कंपनीने (Wipro Company) केला आहे. शिवाय या यंत्रणेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रोग्रामही आहे. (5G For Corporates)

विप्रो कंपनीच्या (Wipro Company) या सेवेला नोकिया कंपनीचा (Nokia Company) डिजिटल ऑटोमेशन क्लाऊडच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आलं आहे. त्यामुळे विप्रो आणि नोकिया कंपनीची ही एकत्रित सेवा आहे. या सेवेत कंपन्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरही पुरवलं जाईल. (5G For Corporates)

(हेही वाचा- Pune Municipal Corporation : नीलेश राणेंची मालमत्ता पुणे महापालिकेकडून सील; काय आहे कारण ? )

विप्रोही भारतातील चौथ्या क्रमांकाची टेक कंपनी आहे. आणि कंपनीच्या अमेरिकेतील ऑस्टिन या शहरात सध्या ५जी (5G For Corporates) नेटवर्किंगवर प्रयोग सुरू आहेत. कंपन्यांना खाजगी इंटरनेट नेटवर्क उभं करून देणारी ही नवीन यंत्रणाही इथंच जन्माला आली आहे. ‘एखाद्या रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया करायची आहे. पण, तिथे जे वायरलेस नेटवर्क आहे त्याच्यावर इतर कामांचाही ताण आहे. आणि त्यामुळे रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी लागणारी नेटवर्कची बँडविड्थ उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशावेळी विप्रो कंपनीचं (Wipro Company) हे खाजगी नेटवर्क उपयोगी पडेल, जे उपलब्ध नेटवर्कची क्षमता वाढवतं. कारण, सध्याच्या वायरलेस यंत्रणा क्षमतेच्या बाबतीत कमी पडत आहेत,’ असं विप्रो कंपनीने (Wipro Company) या उत्पादनाविषयी काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. (5G For Corporates)

कंपनीची ही यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने चालवण्यात येईल.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.