मुंबई – मडगाव दरम्यान २२ ते २६ एप्रिलला धावणार ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

136

मुलांच्या परीक्षा संपल्याने उन्हाळी सुट्टीसाठी आता चाकरमन्यांनी कोकणात गावी जाण्यास तयारी केली असून त्यामुळे प्रवाशांच्या या वाढत्या संख्येमुळे कोकण रेल्वेच्या गाड्यांमध्येही गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या तसेच गोव्याला फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २२, २४ आणि २६ या तिन दिवशी सकाळी ७.५० वाजतागाड्या सोडण्यात येणार आहे, तर मडगावहून याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजता सुटल्या जाणार आहे.

( हेही वाचा : सदावर्तेंवरील पोलीस कारवाईमुळे जे. जे. मधील १२२ कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या )

या गाड्यांमध्ये दोन तृतीय वातानुकूलित, २ वातानुकूलित चेअर कार, २ शयनयान, ४ आरक्षित द्वितीय श्रेणी आसन, गार्ड ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि जनरेटर व्हॅनचा समावेश असेल.

अशाप्रकारे कोकणात धावणार गाड्या

  • (01047) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२ एप्रिल.२०२२, २४एप्रिल २०२२ आणि २६एप्रिल.२०२२ रोजी (३ फेऱ्या) ०७.५० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १७.३० वाजता पोहोचेल.
  • (01048) मडगाव येथून. २२एप्रिल २०२२, २४एप्रिल२०२२ आणि २६एप्रिल२०२२ रोजी (३ फेऱ्या) १९.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०८.२० वाजता पोहोचेल.

कुठल्या स्थानकावर थांबवणार :

दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमाळी.

आरक्षण कसे आणि कुठे कराल

विशेष ट्रेन क्र.01047/01048 साठी विशेष शुल्कासह बुकिंग २१एप्रिल २०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.