ठाण्यात नाशिकची पुनरावृत्ती! वेदांत रुग्णालयात ऑक्सिजनअभावी ६ जणांचा मृत्यू!

127

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा कमालीचा जाणवत आहे, त्यामुळे ऑक्सिजनअभावी रुग्नांचे मृत्यू झाले आहेत. नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात २४ जणांचा मृत्यू झाला. वसईमध्ये विनायक रुग्णालयात ७ रुग्नांचा मृत्यू झाला. सोमवारी ठाण्यातील वर्तकनगर येथील रुग्णालयात सहा रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे.

कारवाईची मागणी!

वतर्कनगर येथील वेदांत रुग्णालयाकडून ऑक्सिजनचे नियोजन न केल्याने सहा रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे, असा आरोप मनसेने आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच खासगी रुग्णालयावर मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी केली. तर पोलिस प्रशासनाने याबाबत ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यातच ऑक्सिजन सिलिंडर आता पुरवण्यात आले असून महापालिकामार्फत ही त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे.

(हेही वाचा : ऑक्सिजनच्या गळतीने २२ रुग्ण दगावले… नाशिकच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार!)

ऑक्सिजन पुरवठा पुरवत करण्याचा प्रयत्न!

सध्या राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत, बऱ्याच खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्ण अत्यवस्थ आहेत, त्यांना ऑक्सिजनची गरज आहे. मात्र ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होत आहे, म्हणून आता सरकार ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा शक्य तितका प्रयत्न करत आहे. मात्र तरीही ऑक्सिजनचा तुटवडा आहेच. त्यामुळे ठाण्यातील वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.