पोलिसांची मोठी कारवाई! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा

कोरची तहसील परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलिस पथकाने मोठे ऑपरेशन केले

160

नक्षलविरोधी कारवाईत पोलिस पथकाने कोंबिग ऑपरेशन दरम्यान 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या घटनास्थळापासून नक्षलवाद्यांचे शव पोलिसांनी केले ताब्यात घेतले. या चकमकीत नक्षलविरोधी पोलिस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले.

नक्षलवाद्यांची गुप्त माहिती प्राप्त

शनिवारी सकाळी कोरची तहसील, मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलिस पथक ऑपरेशन करीत असताना मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी छत्तीसगड भागातून गडचिरोलीत प्रवेश केल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. या माहिती आधारे नक्षलविरोधी पोलिस पथकाने कोबिंग ऑपरेशन केले. या ऑपरेशनात जवळपास सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले असून यात संख्या वाढू शकते. या जखमी पोलिस जवानांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी उशिरापर्यंत ऑपरेशन सुरू असून मोठ्या संख्येत पोलिस तुकड्या पाठविण्यात आल्या. ही घटना धानोरा तालुक्यातील मर्दिनटोला जंगल परिसरातील घडली. नक्षलवाद्यांविरोधात ही मागील काही दिवसांपासूनची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. त्यामुळे कारवाईत आणखी काही संख्येने नक्षलवादी ठार झाले असण्याची शक्यता आहे.

ही कारवाई सर्वात महत्वाची आहे. पोलिसांच्या सी – ६० पथकाला अचूक माहिती मिळाली. त्यामध्ये नक्षलवादी त्याच ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळेच या कारवाईत इतके नक्षलवादी ठार झाले. देशात १० राज्यांमध्ये नक्षलवाद्यांचे जाळे पसरले आहे. आता केंद्रीय पातळीवरून सर्व यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करण्यात आला आहे. त्याचे हे परिणाम आहेत. असेच काम सुरू राहिले तर काही वर्षांतच देशातून नक्षलवादाचे समुळ उच्चाटन होईल.
– प्रवीण दीक्षित, माजी पोलिस महासंचालक

(हेही वाचा : टीबीच्या शोधात महापालिकेची ८७६ पथके दारोदार)

नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार?

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तहसीलमध्ये पोलिसांचे सी-६० पथक शोध अभियान राबवत होते. यावेळी लपून बसलेल्या माओवाद्यांनी अचानक सी-६० पथकावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत गोळीबार केला. सायंकाळी ३ ते ३.३० पर्यंत चकमक सुरू होती. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे सापडली. या कारवाईत नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार झाला असल्याचे समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.