राज्यात गुरुवारी ६ कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यांतही दोन रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात गुरुवारी २२८९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासांत ४०० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७८,६४,८३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आता १४ हजार ५१९ सक्रिय रुग्ण आहेत.
( हेही वाचा : भारताच्या विरोधात अपप्रचार करणारी ७४७ संकेतस्थळे बंद)
राज्यातील मृत्यूदर १.८४ टक्क्यांवर नोंदवला गेला. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२७,८८,७८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,२७,३९५ (०९.७० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,२७,३९५ वर पोहोचली आहे.