शुक्रवारी मुंबई, पुण्यात ओमायक्रॉनचे सात रुग्ण सापडलेले असताना शनिवारी सहा रुग्णांनी कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. सहा रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचा विषाणू न आढळल्याने त्यांना घरी पाठवण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिलीय. शनिवारी राज्यात नव्या ओमायक्रॉनच्या रुग्णाची नोंद झाली नाही.
गेल्या आठवड्यात राज्यातील पहिला रुग्ण ओमायक्रॉन मुक्त
गेल्या आठवड्यात राज्यातील पहिल्या ओमायक्रॉनच्या रुग्णावर यशस्वी उपचार झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. डोंबिवलीतील रुग्णाच्या शरीरात पहिल्यांदा ओमायक्रॉनचा विषाणू आढळला होता. त्यानंतर लागोलाग पुण्यात दीड वर्षाच्या मुलीसह सहा आणि मुंबईत दोन रुग्ण आठवड्याच्या सुरुवातीला दिसून आलेत. शुक्रवारी मुंबईत ३, तर पुण्यात साडेतीन वर्षाच्या मुलासह चार रुग्णांची भर पडली. मात्र १७ पैकी सात रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता केवळ १० रुग्णावर उपचार सुरु आहे.
(हेही वाचा ऑनलाईन गेमने तुमची मुले बिघडतायत, तर हे करून पहाच…)
Join Our WhatsApp Community