प्रदूषणाला आळा बसावा, म्हणून सरकार सीएनजी आणि ई-वाहनांचा वापर करण्याचा सल्ला देत आहे. तसेच, पर्यावरण पूरक वाहनं वापरण्यावर भर देण्याचे आवाहनही करत आहे. पुणे शहरात मात्र 2 लाख वाहनं सीएनीजीवर धावतात, पण या शहरात केवळ 60 सीएनजी पंप आहेत. त्यामुळे इंधन भरण्यासाठी पुणेकरांना 30 ते 40 मिनिटे रांगेत थांबावे लागत आहे.
वाहनांच्या तुलनेत पंप कमी
पेट्रोल- डिझेलच्या तुलनेत सीएनीजी दर कमी आहेत. त्यामुळे अनेक लोक आता आपलं वाहन सीएनजीवर रुपांतरीत करत आहेत. या सीएनजी वाहनांत चारचाकी सोबत रिक्षांची संख्याही जास्त आहे. पण, आता मात्र शहरात वाहनांच्या तुलनेत सीएनजी पंप कमी असल्याने, 40 ते 50 मिनीटे रांगेत उभे राहावे लागत आहे.
( हेही वाचा: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, ‘या’ जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होणार वाढ! )
सीएनजी पंप वाढवण्याची गरज
टाकीत सीएनजी भरताना, त्याचे प्रेशर हे 450 पौंड इतके असते. यावेळी काही अपघात घडला, तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पुण्यातील वाहनांची संख्या लक्षात घेऊन, सीएनजी पंप वाढवण्याची गरज आहे. पुण्यातील या 60 सीएनजी पंपावरुन रोज सात ते साडेसात लाख किलो सीएनजीची विक्री केली जाते. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्यावर सीएनडीच्या विक्रीतही वाढ होत आहे. पुण्यातील वाहनांच्या संख्येनुसार विक्रीत देखील लवकरच वाढ होणार आहे.
Join Our WhatsApp Community