एसटीमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ६०० कोटींची रक्कम सरकारकडून थकीत

एसटी बसमध्ये विविध समाजघटकातील नागरिकांना प्रवाशी भाड्यात सवलत दिली जाते. त्यामध्ये मुख्यत्वे करून स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे साथीदार ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक, ५वी ते १०वीपर्यंत शिक्षण घेणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी, अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व साथीदार, सिकल सेल, डायलेसिस रुग्ण अशा काहींना संपूर्ण मोफत प्रवास तर काहीना ५०% सवलत प्रवाशी भाड्यात दिली जात आहे. एकूण एसटी बसमध्ये २९ प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्याची प्रतीपूर्तीची रक्कम सरकार वर्षानुवर्षे करीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही रक्कम थकली असून सन २०२१ व सन २०२२ मधील एकूण ३८९ कोटी येणे बाकी आहे.

एसटीकडून सरकारला वर्षाला १६०० कोटी रुपये मिळतात 

आतापर्यंतची एकूण अंदाजे ६०० कोटी रुपयांची रक्कम सरकारकडे थकीत आहे. ही रक्कम देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत असून एसटी सक्षम करण्याच्या पोकळ घोषणा करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. एसटी बसमधून समाजातील विविध घटकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामध्ये २९ प्रकारच्या सवलती देण्यात आल्या आहेत. सवलतीच्या संपूर्ण रक्कमेची प्रतिपूर्ती सरकार करीत असून साधारण वर्षाला १६०० कोटी रुपये इतकी रक्कम सरकार महामंडळाला अनेक वर्षे देत आहे. पण सरकारने गेले काही महिने यातील एकही पैसा दिला नसून एसटी सक्षम करण्याच्या निव्वळ गप्पा मारल्या जात आहेत, असेही बरगे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा मिराज, सुखोई लढाऊ विमाने एकमेकांना धडकली; अपघात होण्यामागे काय आहेत कारणे?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here