गौरीगणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीच्या पालघर विभागातर्फे सोय करण्यात आली आहे. राज्य परिवहन विभागाच्या पालघर जिल्ह्याच्या विभागीय नियंत्रण कार्यक्षेत्रातून कोकणात गौरी गपणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता विशेष सोय करण्यात आली आहे. आज, उद्या आणि परवा तब्बल 602 बसगाड्या कोकणातील विविध गावे आणि तालुक्यांच्या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत.
नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यात वास्तव्यास असलेले कोकणवासी गणेशोत्सवासाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील आपल्या गावी मोठ्या संख्येने जात असतात. या प्रवाशांसाठी विशेष सुविधा राज्य परिवहन विभागाच्या पालघर नियंत्रण कक्षामार्फत करण्यात आली असून बहुतांश बस आरक्षण पूर्ण होत आले आहे. विभागातर्फे 16, 17 आणि 18 सप्टेंबरपासून सलग तीन दिवस या बस सोडण्यात येणार आहेत.
(हेही वाचा – Diabeties : बटाट्यासारखी दिसणारी ही भाजी रक्तातील साखर कायमची संपवेल)
राज्य परिवहन विभागाच्या पालघर विभाग नियंत्रण कार्यालयाअंतर्गत असलेल्या मनवेल पाडा बस स्थानक येथून ३२०, तर नालासोपारा बस स्थानकातून २५० बस रवाना होणार आहेत. आज, १६ सप्टेंबर रोजी ४४६, १७ सप्टेंबर रोजी ९५ आणि १८ सप्टेंबर रोजी ४० बस कोकणासाठी सोडण्यात येणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community