महाराष्ट्र सरकारच्या कला संचालनालयाने आयोजित केलेल्या 63व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे (63rd Maharashtra State Art Exhibition) उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे करण्यात आले. राज्यपालांनी ज्येष्ठ ग्राफिक डिझायनर अरुण पद्मनाभ काळे यांना ‘स्वर्गीय वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान केला. ज्येष्ठ धातू शिल्पकार विवेकानंद दास यांना ’63 वा महाराष्ट्र राज्य वरिष्ठ कलाकार पुरस्कार’ देखील देण्यात आला. यावेळी व्हिज्युअल आर्ट क्षेत्रातील पंधरा कलाकारांनाही सन्मानित करण्यात आले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कला संचालक राजीव मिश्रा आणि राज्यभरातील कलाकार उपस्थित होते.
(हेही वाचा – Redevelopment of Building: मराठी माणसांच्या मुळावर उठली उबाठा शिवसेना, विश्राम इमारतीच्या पुनर्विकासाआड उभा ठाकला ‘महेश’)
प्रदर्शन 19 फेब्रुवारीपर्यंत…
या प्रदर्शनात राज्यातील अनेक कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 19 फेब्रुवारीपर्यंत खुले राहील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community