छत्तीसगडच्या (Chhattisgarh) सकती येथे ६५१ ख्रिस्ती कुटुंबियांनी घरवापसी केल्याची माहिती आहे. या ६५१ कुटुंबांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ सनातन धर्मात प्रवेश केला आहे. हे कुटुंब सुरुवातीला हिंदूच (Hindu) होते. मात्र काही कारणास्तव ते धर्मांतराचे बळी ठरले आणि त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. भाजपा नेते प्रबल प्रताप सिंह जुदेव यांच्या नेतृत्वाखाली या कुटुंबाची घरवापसी झाली आहे. (Chhattisgarh)
( हेही वाचा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार; पदभार स्विकारताच मंत्री Shivendra Raje Bhosale यांची ग्वाही)
यावेळी प्रबल प्रताप सिंह जुदेव (Prabal Pratap Singh Judev) म्हणाले, “सनातन संस्कृतीला सर्वात मोठा धोका छद्म हिंदूंपासून आहे. आपल्या हिंदू (Hindu) समाजात राहणारे हे क्रिप्टो ख्रिश्चन फसव्या पद्धतीने धर्मांतराला प्रोत्साहन देतात आणि स्लीपर सेलसारखे काम करतात. त्यांचा पर्दाफाश करणे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे.”, असे ही जुदेव म्हणाले. (Chhattisgarh)
दरम्यान प्रबल प्रताप सिंह जुदेव (Prabal Pratap Singh Judev) हे बागेश्वर धामचे आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांच्या सानिध्यात काम करणारे व अखिल भारतीय घरवापसी संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे कुटुंब दोन पिढ्यांपासून या कार्यात गुंतले असून हजारो कुटुंबांना त्यांनी सनातन धर्मात परत आणले आहे. या कार्यक्रमात साध्वी प्रज्ञासह अनेक हिंदू (Hindu) संत सहभागी झाले होते.(Chhattisgarh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community