राज्यात ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात बुधवारी ७ कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबईत तीन, ठाण्यात दोन, वसई-विरार आणि कोल्हापूरात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नव्या रुग्णांच्या तुलनेत कमी असले तरीही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८२ टक्क्यांवर दिसून येत आहे.

बुधवारी राज्यात ३ हजार ९५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ३ हजार ६९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यातील मृत्यूदर १.८५ टक्क्यांवर नोंदवला गेला. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ९.७३ टक्के रुग्ण कोरोनाबाधित आढळून येत आहेत. मुंबईत बुधवारी १ हजार ५०४ नव्या रुग्णांची भर पडली. सध्या मुंबईत ११ हजार ८४४ कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहेत. पुण्यात ५०६ नव्या रुग्णांसह ३ हजार ८१२ कोरोना रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. मुंबई, पुण्याव्यतिरिक्त संपूर्ण मुंबई महानगर परिसरात रुग्णसंख्या जास्त दिसून येत आहे. ठाण्यात २५९, नवी मुंबईत २०५, रायगडात १३६, पनवेलमध्ये ११८ नव्या रुग्णांची भर पडली.

मुंबईपाठोपाठ सर्वात जास्त सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या ठाण्यात ५ हजार ६५५, पुण्यात ३ हजार ८१२, रायगडात १ हजार ३८२ वर नोंदवली गेली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here