कथित बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू (Asaram Bapu) यांना उपचारासाठी राजस्थान उच्च न्यायालयाने सात दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. ८५ वर्षीय आसाराम बापू पोलीस कोठडीत उपचारासाठी महाराष्ट्रात जाणार आहेत. आसाराम बापू यांच्यावर महाराष्ट्रातील माधवबागमध्ये उपचार होणार आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. पुष्पेंद्र सिंह भाटी यांच्या खंडपीठाने आसाराम बापू यांचा पॅरोल मंजूर केला. आसाराम बापू यांना तब्बल 11 वर्षांनी पॅरोल मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी आसाराम बापू (Asaram Bapu) यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांच्या छातीत तीव्र वेदना होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर तुरुंग प्रशासनाने त्यांच्या तक्रारीची दखल घेत त्यांना जोधपूर एम्समध्ये दाखल केले. एम्समध्ये दाखल करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 10 ऑगस्टपासून त्यांना जोधपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आसाराम बापू यांना उपचारासाठी आल्याची माहिती आसाराम बापू यांच्या समर्थकांना समजताच त्यांचे समर्थक रुग्णालयाबाहेर जमा होऊ लागले आहेत.
(हेही वाचा Maharashtra Cabinet Meeting: सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण होणार )
आसाराम बापू यांच्या याचिकेत काय म्हटले होते?
आसाराम बापू (Asaram Bapu) यांच्या वकिलांनी याचिकेत म्हटले आहे की, धार्मिक नेत्याने यापूर्वी 11 वर्षे तुरुंगवास भोगला आहे आणि त्यांना अनेकदा हृदयविकाराचा झटकाही आला आहे. त्यांचा १४ जानेवारीचा कोरोनरी अँजिओग्राफी अहवालही उद्धृत करण्यात आला. ते म्हणाले की, याचिकाकर्ता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. त्यांचे वय 85 वर्षांपेक्षा जास्त आहे. हॉस्पिटल आणि आपल्या आवडीच्या डॉक्टरांकडून उपचार घेऊ न दिल्यास तुरुंगातच मृत्यू होऊ शकतो, अशी भीती त्यांना आहे.
Join Our WhatsApp Community