कोरोनाची तिसरी लाट : ‘या’ जिल्ह्यातील ७ लाख जनता डेंजर झोनमध्ये

65

कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत ब-याच संकटांना सामोरे जावे लागलेल्या नाशिक जिल्ह्याची तिस-या लाटेतही वाईट स्थिती आहे. जिल्ह्यातील सुमारे ७ लाख लोक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. इतक्या संख्येने लोक डेंजर झोनमध्ये आहेत.

लसीकरणाचे आव्हान

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना विषयक आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले,  या वंचित नागरीकांना दुसरा डोस देण्यासाठीचे नियोजन प्रशासनाने प्राथमिकतेने करण्याचे आवाहन करून ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील दोन महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रात लसीकरण व टेस्टींग आठवडाभरात दुपटीने करण्याचे लक्ष्य निश्चित करावे. जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन ४०२ मेट्रिक टन इतक्या क्षमतेने पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून रुग्णालयातील उपलब्ध बेडसंख्याही कोरोनाच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. या प्रशासकीय तयारीचे कौतुक करताना मागच्या दोन लाटांच्या तुलनेत रुग्णालयातून दाखल रूग्णांचे व ऑक्सिजनवर असलेल्या रूग्णांची संख्या कमी असल्याबद्दलही समाधान व्यक्त केले.

(हेही वाचा राज्यात एकाच दिवशी 416 ओमायक्राॅन रुग्ण, मुंबईने पुण्याला टाकले मागे!)

शाळा सुरू होताना खबरदारीची जबाबदारी प्रत्येकाची

शाळा सुरू करण्याचा आग्रह सर्वच पातळीवरून होताना दिसतो आहे, त्यामुळे शासन-प्रशासनावर या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. परंतु शाळकरी मुले बाधित होणार नाहीत यासासाठीच्या उपाययोजना व खबरदारी ही शासन-प्रशासनाबरोबरच शाळा प्रशासन, पालकांचीही जबाबदारी असून ज्या शाळांमध्ये मुले बाधित होतील तेथे शाळा तात्काळ बंद कराव्यात तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांमध्ये आजाराची सौम्य व तीव्र लक्षणे आढळल्यास त्यांना शाळेत पाठवू नये. असेही आवाहन या बैठकीत पालकमंत्री भुजबळ यांनी केले.

‘नो व्हॅक्सिन नो एन्ट्री’

मॉल्स, मोठी व्यापारी संकुले व किरकोळ दुकानदारांनी लसीकरण प्रमाणपत्राची शहाविषयी केल्याशिवाय ग्राहकांशी कुठलाही व्यवहार करू नये असे सांगून पालकमंत्री यांनी जी दुकाने या याची प्रभावी अंमलबजावणी करत नसल्याचे दिसून येईल त्यांच्यावर बंद/सील करण्याची कठोर कारवाई करण्याची संबंधित स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेने करावी असे यावेळी सांगून लग्न समारंभ ही कोरोना वाढीच्या संक्रमणातील मोठी सुप्रभात स्प्रेडर असून एखाद्या दुकानात ग्राहक काम संपले तर लगेच निघून जातो परंतु लग्न समारंभातून तासन् तास लोक विनामास्क वावरताना दिसतात. तसेच मंगल कार्यालये व लॉन्स यांच्यावर ५० च्या उपस्थितीने बंधन आल्याने आता लोक वाड्या, वस्त्यांवर खुल्या वातावरणात गर्दी करताना दिसतात. अशा कार्यक्रमांवर वॉच ठेवून दंडात्मक कारवाई करण्यच्या सूचना पोलीस यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी करण्याच्या सूचना यावेळी पालमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.