मुंबई महापालिकेच्या देवनार क्षेपणभूमी येथे सध्या तब्बल २० दशलक्ष मेट्रीक टन जुना कचरा जमा झाला आहे. देवनार कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्या अंतर्गत पालिकेने तेथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. (Deonar Waste-Energy Plant)
(हेही वाचा – Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सीआयडीच्या ९ पथकांकडून तपास; आरोपी फरारच)
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात आली आहे. मूळ कंत्राटात कचऱ्यापासून प्रतिदिन ४ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार होती. मात्र त्याच कंत्राटांतर्गत आता प्रतिदिन ७ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येईल. हा प्रकल्प पुढीलवर्षी ऑक्टोबर २०२५ मध्ये कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
६०० मेट्रीक टन कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प
गेल्या आठ-दहा वर्षांपासून पालिकेचे या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू होते. २०१४ मध्ये एकाचवेळी तीन हजार मेट्रीक टन कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे मग छोट्या क्षमतेचे तीन प्रकल्प उभारण्याचे ठरवले. त्यानुसार ६०० मेट्रीक टन कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे निश्चित झाले आहे. या प्रकल्पाची आखणी व बांधकामाला २०२२ पासून सुरुवात झाली असून हा प्रकल्प पुढील वर्षी ऑक्टोबर २०२५ पासून कार्यान्वित होणार आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. प्रकल्पातून मिळणाऱ्या विजेचा वापर पालिकेच्या भांडूप संकुलातील विविध विद्युत यंत्रणांसाठी केला जाणार आहे. (Deonar Waste-Energy Plant)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community