पिंपरी-चिंचवड मध्ये गेल्या सात दिवसांत इतक्या हत्या

या हत्या कुठल्याही टोळींच्या मार्फत करण्यात आल्या नसल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.

सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. पण आलीकडे पुणे जिल्ह्यात खुनांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या 7 दिवसांत एकूण सात हत्या घडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तळेगाव, दाभाडे, निगडी, चिखली, हिंजवडी, रावेत या पुण्यातील महत्त्वाच्या भागांत प्रत्येकी एक तरवाकड परिसरात दोन हत्यांची नोंद झाली आहे. या सर्व घटनांतील आरोपींना पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अनेक मुख्य आरोपींना गजाआड केले आहे.

या सर्व हत्या व्यक्तिगत राग, कौटुंबिक हिंसा आणि दारुच्या नशेत घडल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हत्या कुठल्याही टोळींच्या मार्फत करण्यात आल्या नसल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.

मागील 2 वर्षांच्या तुलनेत संख्येत घट

यावर्षात एकूण 48 हत्येच्या घटना घडल्या असून, मागील दोन वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. 2018 मध्ये 72, 2019 मध्ये 68 आणि 2020 मध्ये 72 हत्या घडल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी आहे. राज्यात अनलॉक झाल्यानंतर मोठ्या संख्येने मजूर उद्योग व्यवसायांसाठी शहरात परत आले आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबात पती-पत्नींमध्ये, मित्रांमध्ये वाद, पैशांचे व्यवहार यांमुळे या हत्या घडत आहेत.या सर्व गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिस कार्यरत आहेत, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

(हेही वाचाः पिंपरी-चिंचवड हादरले… 48 तासांत झाले चार खून)

मनुष्यबळाची कमतरता

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे केवळ फेस-1 ची पॉलिसी असून, फेस-2 आणि 3 ची भरती कोरोनामुळे रखडली आहे. आम्ही पोलिस स्थानकांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी केली आहे. तसेच नवीन पोलिस स्थानकांमुळे आम्हाला अधिकचे मनुष्यबळ मिळेल, त्यामुळे चांगल्या प्रकारे रक्षण करण्यास आम्हाला मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here