शुक्रवारी, १० डिसेंबर रोजी मुंबईत ओमायक्रॉनचे तीन, तर पुण्याचे चार नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली. यापैकी पुण्यातील चार नव्या रुग्णांमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. नव्या सात रुग्णांमुळे राज्यभरातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा डोंबिवलीतील रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे.
टांझानियातून आलेल्या रुग्णाचे लसीकरण नाही
मुंबईत टांझानिया देशातून ४ डिसेंबरला आलेली ४८ वर्षीय व्यक्ती, दक्षिण आफ्रिकेतून आलेली ३७ वर्षीय गुजरातचा रहिवासी आणि १ डिसेंबर रोजी लंडनहून आलेली २५ वर्षीय तरुणी यांची कोरोना तपासणी सकारात्मक आल्यानंतर त्यांचा जनुकीय अहवाल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत जनुकीय अहवालासाठी पाठवण्यात आला होता. या तिन्ही रुग्णांच्या शरीरात ओमायक्रॉन विषाणू आढळल्याचा अहवाल शुक्रवारी मिळाला. त्यापैकी टांझानियातून आलेल्या ४८ वर्षीय रुग्णाने लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नाहीत. उर्वरित दोन्ही रुग्णांचे कोविडचे दोन्ही लसीकरण पूर्ण झालेले आहे. तर मूळ भारतीय वंशाच्या नायजेरियन महिलेच्या ओमायक्रॉनची लागण झालेल्या ४७ वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेल्या पिंपरी चिंचवडमधील चारजणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सात नव्या रुग्णांपैकी चार जणांनी कोरोनाच्या दोन्ही लसीकरण पूर्ण केले आहे. तर एकाने एकच लस घेतलीय तर मुंबईतील टांझानिया देशातून परतलेल्या ४८ वर्षीय रुग्णाने एकही लस घेतलेली नाही.
(हेही वाचा मुंबईची वाढली चिंता! धारावीत ओमायक्रॉनचा सापडला रुग्ण)
Join Our WhatsApp Community